🔸 तरुण तडफदार न्यूज । शशांक बोरकर🔸
ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय येथे
ज्ञानगंगोत्री भित्तीपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने. यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या साहित्यिक कला गुणांना वाव मिळण्यासाठी महाविद्यालयात , मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ज्ञान गंगोत्री नावाचे भित्तीपत्रक सुरू केले आहे. यात समन्वयक म्हणून डॉ महेंद्र सोनवणे तर सदस्य म्हणून डॉ. रेखा पाटील, प्रा डॉ पिरू गवळी, प्रा डॉ नरेंद्र मुळे हे आहेत. या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील प्रा डॉ रामटेके, प्रा. उमरीवाड, प्रा. ज्ञानेश्वर कोळीआणि विद्यार्थी हजर होते.