Thursday, June 15, 2023

रावेर शहरावर सी सी टिव्ही ची नजर,मान्यवर यांचे उपस्थितीत शुभारंभ taruntadafdarnews/shashankborkar


रावेर येथे आज रोजी सीसीटीव्ही कॅमेरा व विश्रामगृहाचे उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी पोलीस अधीक्षक एम राजकुमार प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी श्री चव्हाण तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पंकज आशिया. उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे रावेर प्रांत कैलास कलगड फैजपूर पोलीस निरीक्षकतहसीलदार बंडू कापसे साहेब. कैलास नागरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मान्यवर मध्ये शिवसेनेचे  प्रल्हाद महाजन भारतीय किसान संघटनेचे श्री प्रशांत बोरकर भाजपाचे पद्माकर महाजन ऍडव्होकेट योगेश गजरे अशोक शिंदे नितीन पाटील अनिल शेठ अग्रवाल शरद अग्रवाल तसेच असंख्य शांतता कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते मान्यवरांची भाषणे यावेळी झाली जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक श्री राजकुमार यांनी म्हटले की तरुणांनी आपला सदुपयोग आपल्या कॅरियर व अभ्यासाकडे लक्ष द्यावे कोणत्याही प्रकारे सोशल मीडियावर चुकीचे संदेश देऊन आपले आयुष्य बरबाद करू नये आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांकडे लक्ष देऊन ते कोणत्या ग्रुप मध्ये आहेत याकडे लक्ष द्यावे तसेच आता सीसीटीव्ही मार्फत आरोपी यांना पकडण्यात यश मिळेल त्याबरोबर जे निरपरात आहेत ज्यांचे नावे मुद्दामून टाकले जातात अशा लोकांना सुद्धा संरक्षण मिळेल असे पोलीस अधीक्षक यावेळी सांगितले यावेळी मान्यवरांचे भाषण झाले त्यात दिलीप कांबळे पद्माकर महाजन आदींचा भाषणे झाली यावेळी रायगडावर प्रात्यक्षिक करणाऱ्या मुलींचा सत्कार करण्यात आला तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याबद्दल मुख्याधिकारी श्री मालेगावें मॅडम तसेच कॉन्टॅक्ट प्रफुल्ल तसेच सुधाकर नाईक आणि मुन्ना अग्रवाल यांनी मदत केल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आला

Monday, March 27, 2023

ऐनपूर महाविद्यालयात सॉफ्ट स्किल ट्रेनिंग वर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

तरुण तडफदार न्यूज शशांक बोरकर

ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील ट्रेनिंग एंड प्लेसमेंट सेल तर्फे आयक्यूएसी व माजी विद्यार्थी मंडळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय सॉफ्ट स्किल ट्रेनिंग कार्यशाळेचे आयोजन दि. १८/०३/२०२३ शनिवार रोजी करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. के. जी. कोल्हे हे होते. कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. डी. बी. पाटील व प्रा. नरेंद्र मुळे हे उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. डी. बी. पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमाचे महत्व समजून सांगितले. विद्यार्थ्यांनी अश्या कार्यक्रमांमधून आपल्या स्किलचा विकास केला पाहिजे असे प्रा. डॉ. के. जी. कोल्हे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. प्रथम सत्रात प्रा. मुळे यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किलचा विकास आपल्यामध्ये का केला पाहिजे तसेच तो कसा केला पाहिजे हे समजावून सांगितले. व्दितीय सत्रात डॉ. डी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमधून व लहान लहान मनोरंजात्मक उपक्रमांमधून सॉफ्ट स्किलचा विकास कसा करता येतो हे सांगितले. कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेतला. या कार्यशाळेत एकूण ५० विद्यार्थी सस्भागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. जयंत नेहेते यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. बी. पाटील, प्रा. डॉ. जयंत नेहेते, प्रा. एच. एम. बाविस्कर, डॉ. एस. एन. वैष्णव, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. संकेत चौधरी, श्री नितिन महाजन, श्रेयश पाटील, अनिकेत पाटील, हर्षल पाटील तसेच सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.

Sunday, March 26, 2023

उद्योगमंत्री श्री श्याम रजक जी यांच्या सोबत आज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली

तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । शशांक बोरकर

बिहार RJD पक्षाचे सेक्रेटरी, पटणा शहर मधून सलग सहा वेळा आमदार राहिलेले (३० वर्ष) श्री लालू प्रसाद यादव जी, श्री तेजस्वी यादव जी यांचे निकटर्तीय तथा उद्योगमंत्री श्री श्याम रजक जी यांच्या सोबत आज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली..
यावेळी उद्धव साहेब व श्याम रजक यांच्यामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर व भविष्यातील राजकीय वाटचाली बाबत चर्चा झाली...
आजही भेट भविष्यातील राजकीय नांदी ठरेल येवढं नक्की.. ही भेट महत्वपूर्ण असेल या पूर्वी आदित्य ठाकरे जी बिहार चे उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भेटुन आले होतेश्री रजक यानी.. मुंबई महानगरपालिकाबाबत ही याभेटीत त्यांनी चर्चा केली..
त्यांचे सोबत प्रदेश अध्यक्ष श्री विजय कंडारे जी अन्य सेना राजद कार्यकर्ते होते
  

प्रेस शी बोलतना 
प्रशांत बोरकर राज्य प्रवक्ता और महाराष्ट्र महासचिव
राष्ट्रीय जनता दल 
यानी माहिती दिली।

🚩रावेर येथे संत श्री झुलेलाल महाराज जयंती चेट्री चंड पर्व मोठ्या उत्साहात साजरा🚩

तरुण तडफदार न्यूज

🚩रावेर येथे संत श्री झुलेलाल महाराज जयंती चेट्री चंड पर्व मोठ्या उत्साहात साजरा🚩



रावेर तरुण तडफदार प्रातिनिधी शशांक बोरकर

रावेर येथे सिंधी समाजाच्या वतीने संत श्री झुलेलाल महाराज जयंती निमित्त चेट्री चंड पर्व मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला . सकाळी समाजाचे युवा तरुणांनी रावेर शहरातून मोटर सायकल रॅली काढून रावेरकरांचे लक्ष वेधले . तसेच संत श्री झुलेलाल महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . संध्याकाळी रावेर शहराच्या प्रमुख मार्गावरून संत झुलेलाल महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. सर्व सिंधी समाज बांधव दिवसभर आपली दुकाने बंद करून विविध कार्यक्रमांत सहभागी झाले होते . तसेच मिरवणूकी मध्ये सुद्धा मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते .

Tuesday, March 21, 2023

🔸कर्मचाऱ्यांचे संप मागे निर्णयाचे स्वागत, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे सुरु - मुख्यमंत्री🔸

*🔸कर्मचाऱ्यांचे संप मागे निर्णयाचे स्वागत, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे सुरु - मुख्यमंत्री🔸*


*@TARUNTADAFDARNEWS*

*युट्युब व्हिडिओ पाहण्यासाठी निळ्या लिंकला वलीक करा👇👇👇👇*

https://youtu.be/ESn8agridO8

*🔴असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या तरुण तडफदार न्यूज TARUNTADAFDARNEWS चॅनेलला Subscribe करा धन्यवाद !*🔴

https://youtube.com/c/TARUNTADAFDARNEWS