Saturday, March 23, 2024

अॅडव्होकेट.उदय एम.सोनार यांची भारत सरकारच्या नोटरी वकील पदी नियुक्ती


अॅडव्होकेट.उदय एम.सोनार यांची भारत सरकारच्या नोटरी वकील पदी नियुक्ती झाली त्या निमित्ताने त्यांचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा - 
🔸शशांक बोरकर व्हिडिओ एडिटर , तरुण तडफदार न्यूज
🔸वैश्य सोनार समाज रावेर💐💐🌹🌹💐💐🌹🌹👌👌✌️✌️

ओबीसी जनकल्याण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांची निवड

ओबीसी जनकल्याण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांची निवड
🔸 मुंबई । तरुण तडफदार प्रतिनीधी । शशांक बोरकर🔸
महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विचारवंत निर्भीड पत्रकार ओबीसी आदिवासी चळवळीचे तरुण तडफदार नेते श्री प्रशांत बोरकर यांची ओबीसी जनकल्याण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली आहे. 
आज रोजी ओबीसी जनकल्याण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार यादव सेसाई यांनी भोपाल येथून आज श्री प्रशांत बोरकर यांची निवड जाहीर केली 
श्री प्रशांत बोरकर यांनी समाजाच्या विविध घटकांच्या साठी कार्य केलेले आहे

ओबीसी विद्यार्थ्यांना वस्तीगृह सुरू व्हावे ओबीसी विद्यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू करण्यात यावी ओबीसी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र साठी अशा अनेक प्रकारच्या बाबतीत श्री प्रशांत बोरकर हे केल्या 35 वर्षापासून पाठपुरावा करीत आहेत.
ओबीसी च्या विकासासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ओबीसी आरक्षण परत मिळण्यासाठी तसेच ओबीसींसाठी छोट्या छोट्या जातींना न्याय मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना लागू करण्यासाठीओबीसी चे राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी लढा उभारणार असल्याचे महाराष्ट्रात एक मोठे ताकद निर्माण करणार असल्याचे श्री प्रशांत बोरकर यांनी नियुक्तीच्या वेळी म्हटले आहे

रावेर आगारात तारकपूर (अहमदनगर) आगाराची अयोध्या एक्सप्रेस मधील प्रवाश्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वतीने 🚩चहा पाण्याची व्यवस्था तसेच कामगार सेनेच्या माध्यमातून डॉ. संदिप पाटील, रावेर यांचे सौजन्याने जेवण

🔸रावेर । तरुण तडफदार प्रतिनीधी । प्रशांत बोरकर🔸
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रावेर आगारात आज दिनांक 21/03/2024 रोजी तारकपूर (अहमदनगर) आगाराची *अयोध्या एक्सप्रेस* अयोध्या येथून दर्शन घेऊन तारकपूर येथे परतीचा प्रवास करण्यासाठी बऱ्हाणपूर मार्गे रावेर आगारात डिझेल भरण्यासाठी जय श्रीराम च्या जयघोषात येत असतांना *महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या🚩 कार्यकर्त्यांना माहीत झाले असता, तत्परतेने बसमधील सर्व भाविकांसाठी तसेच बस वरील रा.प. कर्मचाऱ्यांसाठी रावेर आगारातील दत्त मंदिर येथे चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. 
            त्याचबरोबर भर दुपारची वेळ असल्याने तसेच सर्व प्रवाशांचे जेवण अद्याप बाकी असल्याचे लक्षात घेऊन कामगार सेनेच्या माध्यमातून तत्परतेने लालपरी मधील सर्व प्रवाशांसाठी हॉटेल मानस गार्डन, रावेर येथे डॉ. संदिप पाटील, संचालक माऊली हॉस्पिटल, रावेर यांचे सौजन्याने जेवण ठेवण्यात आले. यावेळी सर्व प्रवाशांनी शेवभाजी, पोळी, भात, जिलेबी याचा आस्वाद घेत रावेरकरांचे आभार मानले. सर्व भाविकांसाठी पाहुणचार करतांना एक वेगळा आनंद वाटत होता.
            या सर्व कार्यक्रमासाठी श्री. आर.के. पाटील-राज्य चिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना यांचे मार्गदर्शनानुसार रावेर आगारातील श्री. मधुकर चौधरी, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना, श्री. अमजद तडवी, आगार सचिव , रावेर आगार,, श्री. शाम भामरे- रावेर तालुका शिवसेना कार्यकर्ते , श्री किरण वाणी- सदस्य कामगार सेना, श्री. योगेश जोशी, वाहतूक नियंत्रक यांनी परिश्रम घेतले. याकामी श्री. विजय पाटील साहेब आगार व्यवस्थापक, रावेर आगार यांचे सूचनेनुसार श्री. विश्वजित तेली- सहा.कार्यशाळा अधिक्षक, श्री. संदिप तायडे, सहा.वाह. अधिक्षक, कु.कोकिळा काळे मॅडम- वरिष्ठ लिपिका, सुरेखा तायडे मॅडम लिपिका, उपस्थित कार्यशाळा कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लागले. याप्रसंगी महाराष्ट्र एस. टी. कामगार सेने तर्फे श्री. शाम भामरे, शिवसेना कार्यकर्ते यांनी सर्वांचे आभार मानले....

 *जय महाराष्ट्र* 

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩