🔸तरुण तडफदार न्यूज । शशांक बोरकर🔸
कॉपी न करता परिक्षा द्याः डॉ एम के सोनवणे याचे मार्गदर्शन
ऐनपुर तालुका रावेर सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथे विद्यार्थींसाठी ताण- तणाव मुक्त/ कॉफी मुक्त परिक्षा अभियान कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी केले. या कार्यशाळेत डॉ एस ए पाटील यांनी विद्यार्थ्यांना ताण तणाव न घेता चांगला अभ्यास करावा म्हणजे सहज कॉपी मुक्त परिक्षा होणार, तसेच आहार व झोप हे सुद्धा तणा तणाव कमी करण्यासाठी महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले. तसेच डॉ एम के सोनवणे यांनी कॉपी न करता चांगला अभ्यास करावा या विषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेची प्रस्तावना व सुत्रसंचलन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा.डॉ आर व्हीं भोळे, उपप्राचार्य डॉ सतीश वैष्णव, डॉ जे पी नेहेते, डॉ नरेंद्र मुळे, डॉ व्ही एन रामटेके, प्रा. एस बी महाजन, डॉ संदीप सांळुखे, डॉ पी आर गवळी, प्रा. प्रा. प्रदीप तायडे, प्रा. अक्षय महाजन तसेच हर्षल पाटील, श्रेयश महाजन, अंकुर पाटील या सर्वांनी प्रयत्न केले .