रावेर । तरुण तडफदार न्यूज । शशांक बोरकर🔸
आज दि.21/6/2025 रोजी श्री शिव प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्या मंदिर रावेर शाळेत 21 जून हा जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका सौ.ललिता राणे मॅडम यांनी योग केल्यामुळे होणारे शारीरीक तसेच मानसिक फायदे यांचे महत्व सांगीतले.
सूत्रसंचालन श्री. नितीन पाठक सर यांनी केले. याप्रसंगी सूर्यनमस्काराच्या प्रात्यक्षिकांमध्ये इ.1ली ते 10 वी पर्यतचे सर्व विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक यांनी सहभाग नोंदवला. पूरक हालचाली अंतर्गत मानेच्या हालचाली,पायांच्या ,कंबरेच्या हालचाली,तसेच आसने ताडासन ,वृक्षासन , पादहस्तासन,अर्धचक्रासन , त्रिकोणसन, भुजंगास न,कपालभाती ,प्राणायाम,व ध्यानाद्वारे योगदिन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर ,शिक्षक श्री उमेश चौधरी,श्रीमती उषा चव्हाण,श्री राजेंद्र सपकाळ, श्री चंद्रकांत पाठक,अनिता सपकाळे ,श्री सागर पवार, अश्विनी गाढे, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री जितेंद्र कानूगो उपस्थित होते.
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐