Monday, March 27, 2023

ऐनपूर महाविद्यालयात सॉफ्ट स्किल ट्रेनिंग वर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

तरुण तडफदार न्यूज शशांक बोरकर

ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील ट्रेनिंग एंड प्लेसमेंट सेल तर्फे आयक्यूएसी व माजी विद्यार्थी मंडळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय सॉफ्ट स्किल ट्रेनिंग कार्यशाळेचे आयोजन दि. १८/०३/२०२३ शनिवार रोजी करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. के. जी. कोल्हे हे होते. कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. डी. बी. पाटील व प्रा. नरेंद्र मुळे हे उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. डी. बी. पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमाचे महत्व समजून सांगितले. विद्यार्थ्यांनी अश्या कार्यक्रमांमधून आपल्या स्किलचा विकास केला पाहिजे असे प्रा. डॉ. के. जी. कोल्हे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. प्रथम सत्रात प्रा. मुळे यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किलचा विकास आपल्यामध्ये का केला पाहिजे तसेच तो कसा केला पाहिजे हे समजावून सांगितले. व्दितीय सत्रात डॉ. डी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमधून व लहान लहान मनोरंजात्मक उपक्रमांमधून सॉफ्ट स्किलचा विकास कसा करता येतो हे सांगितले. कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेतला. या कार्यशाळेत एकूण ५० विद्यार्थी सस्भागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. जयंत नेहेते यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. बी. पाटील, प्रा. डॉ. जयंत नेहेते, प्रा. एच. एम. बाविस्कर, डॉ. एस. एन. वैष्णव, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. संकेत चौधरी, श्री नितिन महाजन, श्रेयश पाटील, अनिकेत पाटील, हर्षल पाटील तसेच सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Thanks
https://www.linkedin.com/in/tarun-tadafdar-news-002b4a1a5
https://taruntadafdarnews.wordpress.com/ https://mobile.twitter.com/TARUNTADAFDAR8 https://www.youtube.com/c/TARUNTADAFDARNEWS