Wednesday, February 14, 2024

रावेरच्या जुन्या राजकारणातील एक युवा जीवन हरवले

रावेरच्या जुन्या राजकारणातील एक युवा जीवन हरवले
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸


रावेरच्या राजकारणातील छोट्या समाजातील एक कर्तृत्ववान मेहनत करणारे व्यक्तिमत्व म्हणजे जीवनलाल लोहार रावेर चा रथ ओढायचा असो की मुंबईला जाऊन जनतेच्या नेत्यांच्यासाठी साथ देणारा कार्यकर्ता अशी ओळख त्यांची होती काँग्रेसच्या काळात बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांना संरक्षण देणारा त्यांच्यासाठी रोखठोक काम करणारा अशी भूमिका घेणारा .
रावेर चा रथ भरधाव होत असताना लोकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मांडीचे ब्रेक करून अडवणारे रोखणारे त्यात जखमी होणारे जीवन आज नाही हे न पटणारी गोष्ट आहे .

श्री जीवन लोहार यांच्याबरोबर दोन निवडणुका पीपल बँकेच्या लढवल्या.सकाळी चार वाजेपासून प्रत्येक गावागावामध्ये जळगाव जिल्ह्यात आणि बऱ्हाणपूरच्या काही भागांमध्ये गावोगाव घरघर पिंजून काढली होती एका मोटरसायकल वर एका लोकसभेचा मतदारसंघ पिंजून काढावा तसे आम्ही घरोघर लोकांना भेटी दिल्या होत्या त्यावेळी त्यांच्या मोटरसायकलवर सकाळी चार वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत सातत्याने लोकांची जनसंपर्क होत होता अनेक लोक ना ओळखणारे संबंध ठेवणारे जीवन सेट होते मला लोक नावाने ओळखत होते परंतु त्यांच्यामुळे असंख्य लोकांचा संपर्क झाला अशा निवडणुकांमधून जनतेशी विवेक पातळीवर चर्चा ही होत असे शेतकऱ्यांना भेटण्याची वेळ सकाळीच असते हे पहाटे असते हे समजून सांगून मला सोबत घेऊन फिरणारे जीवन शेठ आज आपल्यात नाहीत याचे फार मोठे दुःख आहे असे कितीतरी कार्यकर्ते आपल्या छोट्या समाजामध्ये मोठे काम करणाऱ्या आहेत परंतु त्यांना योग्य ती संधी साथ न मिळाल्याने बाहेरच्या शहरांकडे पुणे मुंबईकडे जावे लागत आहे हेही मोठे दुःख आहे सातत्याने संघर्ष हा रावेर परिसरातील कार्यकर्त्यांच्या नशिबी आला आहे कुठेतरी तळमळणारे धडपडणाऱ्या कर्त्यांची कार्यकर्त्यांचं चीज व्हावं रावेरच्या भूमीमध्ये काहीतरी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा त्यांना संधी मिळावी हीच या प्रकरणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करताना मत व्यक्त करतो .💐रावेर मधील धडपडणारा एक जीवन संपले आहे हे जड अंतर करण सांगतो😢🙏🕯️✍️
प्रशांत बोरकर
8208361187

No comments:

Post a Comment

Thanks
https://www.linkedin.com/in/tarun-tadafdar-news-002b4a1a5
https://taruntadafdarnews.wordpress.com/ https://mobile.twitter.com/TARUNTADAFDAR8 https://www.youtube.com/c/TARUNTADAFDARNEWS