Friday, February 20, 2026

दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे दहावीच्या शालांत परीक्षेसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून दिली

🔸रावेर । तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । प्रशांत बोरकर🔸
आज दि 20/02/26 रोजी इयत्ता दहावीचे नाशिक बोर्डाचे पेपर चालू झालेले आहे तरी दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य तालुका रावेर जिल्हा जळगावच्या तर्फे कमलाबाई गर्ल हायस्कूल रावेर येथील दिव्यांग विद्यार्थिनी व केऱ्हाळा येथील विद्यार्थी कु.सार्थक प्रशांत पाटील वविद्यार्थी कू.भाविका देवेंद्र निंबाळकर यांना दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे दहावीच्या शालांत परीक्षेसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून दिली, 
त्याप्रसंगी उपस्थित दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री संजय दिनकर बुवा, उपाध्यक्ष श्री घनश्याम हरणकार, खजिनदार श्री रजनिकांत बारी, सदस्य श्री संजु माळी पवन श्रीनामे, महेश महाजन, विनोद चव्हाण, पुंडलिक महाजन, 
तसेच गर्ल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ पी जे कुलकर्णी मॅडम, श्री विशाल राठोड सर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप बारी, सर्व पदाधिकारी उपस्थित होते
व सर्वांनी दोघांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या .

💥 महाराष्ट्र वैश्य संघ,नागपूरच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर सामूहिक व्रतबंध,सामूहिक विवाह आणि वधू-वर परिचय मेळाव्याचे भव्य आयोजन

🔸नागपूर । तरुण तडफदार न्यूज । प्रशांत बोरकर🔸
🙏🙏सस्नेह नमस्कार ! 🙏🙏

💥 *महाराष्ट्र वैश्य संघ* , नागपूरच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर *दिनांक 18 आणि 19 जून 2026* रोजी *सामूहिक व्रतबंध* , *सामूहिक विवाह* आणि *वधू-वर परिचय* मेळाव्याचे, भव्य आयोजन करण्यात आले असून स्थानिक *रॉयल गंगा* सेलिब्रेशन पारडी, नागपूर येथे संपन्न होणार आहे.

💥 *गुरुवार दि. 18 जून 2026* रोजी दुपारी सिमंती पुजन व हळदीचा कार्यक्रम, वधू-वर परिचय मेळावा आणि समाजाच्या 80 व्या वर्धापन दिना निमित्त सत्कार समारंभ तर *शुक्रवार दि. 19 जून 2026* रोजी सामूहिक विवाह, सामूहिक व्रतबंध संपन्न होईल.

💥 बाहेर गावाहून येणाऱ्या पाहुणे मंडळी, व नातलगांकरिता 18/19 ह्या दोन्ही दिवसाची निवास - भोजनाची निशुल्क व्यवस्था कार्यक्रम स्थळीच करण्यात आली आहे. 

💥 यावर्षी प्रथमच *सामूहिक विवाहचे* आयोजन करण्यात येत असून ह्या पहिल्या- वहिल्या स्तुत्य उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर एक नवा आदर्श आणि नव्या परिवर्तनाचा पायंडा निर्माण करता येईल तेव्हा जास्तीत जास्त समाज बांधवांनी याचा लाभ घेऊन स्वयंफूर्त सहभाग नोंदवावा ही विनंती.

💥 तव्दतच यापूर्वी 85 बटुंची मौन्ज केली होती यावर्षी *101* बटूची मौन्ज करण्याचा मानस आहे तेव्हा सर्व समाज बांधवाना नम्र विनंती की आपण आपल्या जिल्हातील, ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक बांधवांशी संपर्क-संवाद साधून ह्या सामाजिक उपक्रमात बहुसंख्य सहभाग नोंदवावा.

💥 *व्रतबंध शुल्क* ₹. 11000 /-  
 *सामूहिक विवाह* शुल्क ,₹. 31000 /-
( आर्थिक स्थिती जेमतेम असणाऱ्या समाज बांधवांकरिता हे शुल्क ऐच्छिक असेल.)

💥 *लग्न व मौंजेकरिता लागणारे पूजेचे सर्व साहित्य संस्था देईल* तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या समाज बांधवाची गैरसोय होऊ नये व एकाच ठिकाणी सर्वांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून महाराष्ट्र वैश्य संघाने रॉयलगंगा सेलिब्रेशन, पारडी हा भव्यदिव्य असा परिसर कार्यक्रम स्थळ म्हणून निश्चित केलेला आहे.शिवाय सदर कार्यक्रमात जवळपास दोन ते तीन हजर समाज बांधवाचा सहभाग अपेक्षित आहे त्यामुळे नीटनेटक्या नियोजनावर विशेष भर देण्यात येत आहे.
 
💥 हा उपक्रम सर्वसमावेशक, सर्वस्पर्शी सामाजिक उपक्रम असल्याने सर्व समाज बांधवांच्या सहकार्याशिवाय परिपूर्ण होणार नाही या जाणीवेतून समाज बांधवानी जास्तीतजास्त सहभाग आणि सहकार्य करावे ही विनंती. तेव्हा साद द्या.... प्रतिसाद द्या.....    
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
             II *आपले आम्ही* II 

 *अनिल भा.वलोकर (अध्यक्ष)* 
*अजय या.वाऊ (सचिव)* 

 *समस्त कार्यकारिणी मंडळ* 
 *महाराष्ट्र वैश्य संघ नागपूर*

 *महाराष्ट्र वैश्य संघ,नागपूर* 
 दिनांक 18 व 19 जून 2026 रोजी होणाऱ्या सामुहिक व्रतबंध, सामूहिक विवाह, वधू वर परिचय करिता 
 *संपर्क क्रमांक व क्यूआर कोड* 
श्री *दत्तात्रय वलोकर* 8888570397
श्री *सदानंद शेटे* 9890921456
श्री *अजय वाऊ* 9420856499 / 8208165724

 🙏🙏 नमस्कार 🙏🙏
 *महाराष्ट्र वैश्य संघ नागपूरच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर* *आयोजित सामूहिक व्रतबंध कार्यक्रम दिनांक 19/06/2026* 

 *बटू नोंदणी :--* 

1) *चि.सार्थक* आशीष जडे मु. मारडा ता. तिवसा जि. अमरावती
आई -सौ. विद्या आशिष जडे मोबाईल no.9765695658
2) *चि. सुबोध* ज्ञानेश्वर जडे  मु.मारडा ता. तिवसा जि. अमरावती
आई- श्रीमती सुषमा ज्ञानेश्वर जडे मोबाईल no.9765695658
3) *चि. सक्षम* प्रफुल जडे मु.मारडा ता. तिवसा जि. अमरावती
आई -सौ. चंदा प्रफुल जडे मोबाईल no.9356072426
4) *चि. संचित* प्रमोद बिंड मु. अकोला डाबकी रोड 
आई -रूपाली प्रमोद बिंड मोबाईल no.99227 18088
5) *चि. अभिलाष* गजानन बिंड मु.खरबी नागपूर 
आई - सौ. माया गजानन बिंड मोबाईल no.70386 46978
6) *चि. सारंग* गजानन बिंड मु.खरबी नागपूर 
आई -सौ. माया गजानन बिंड मोबाईल no.70386 46978
7) *चि. सर्वेश महेश* वलोकार  मु. पावणगाव ता. कामठी जि. नागपूर 
आई -सौ. सुवर्णा महेश वलोकार मोबाईल no.9881137672
8) *चि.सिद्धेश* राजेंद्र शिळणकर मु. हुडकेश्वर नागपूर 
आई -सौ. रिता राजेंद्र शिळणकर मोबाईल no.90969 26505
9) *चि.ओम*  राजेश पंत मु. वाडी नागपूर 
आई -सौ सारिका राजेश पंत मोबाईल no.9923819197
10) *चि. चिन्मय* दिपक सोनार आडगाव शिवार, नासिक
 आई -सौ. शितल दीपक सोनार मोबाईल no.8605126251
11) *चि. अकुल* विलास भटूरकर अकोला
 आई-अलका विलास भटूरकर मोबाईल no. 9112727871
12) *चि. कृष्णा* विजय चुडीवाले मु. बुराणपूर
आई -सौ. ममता विजय चुडीवाले मोबाईल no. 7999768649
13) *चि. स्पर्श* पराग बोरकर मु. विद्या नगर,नागपूर
आई-सौ. नितल पराग बोरकर मोबाईल no. 7999388246
14) चि. प्रथमेश राहुल पोहेकर मु. वाडी नागपूर आई सौ पद्मा राहुल पोहेकर , मो.9075395680/9766140289
15) चि. आदेश शेखर वितोंडे वय १०, मु. पेठ आंजी, वर्धा
7517599709
16) चि. मानस प्रशांत बोरकर, आई सौ.सोनाली प्रशांत बोरकर मुक्काम पुणे मो.9370460666
17) चि. शशांक प्रशांतराव गोटीवाले, भोपाळ आई सौ.अंजली प्रशांतराव गोटीवाले मो.9893956694
18) चि. प्रियांश संजोग गोटीवाले भोपाळ , आई सौ. अश्विनी संजोग गोटीवाले मो.8962203852
19) चि. रिदांश संजोग गोटीवाले.आई सौ. अश्विनी संजोग गोटीवाले, भोपाळ मो.8962203852
20) चि. शिवांश विशाल गोटीवाले , आई सौ. सीमा विशाल गोटीवाले, भोपाळ 9039894922
21) चिर शिवम प्रशांत ओझरकर आई सौ. छाया प्रशांत ओझरकर मो.9325206775
22) चि.अंश प्रसाद वडाळकर आई सौ. स्नेहल प्रसाद वडाळकर, अमरावती 9881571769

 वरील कार्यक्रम अखिल भारतीय स्तरावर आयोजित करण्यात येत असल्याने आपल्या परिवारातील अथवा परिचयाचे जर कोणी बटु किंवा लग्न करिता candidate असेल तर त्यांना वरील नंबर वर संपर्क करायला सांगावे धन्यवाद .

Monday, February 16, 2026

🚩संतभूमी रावेर येथील स्टेशन रोड वरील विश्वरूप नगर येथील श्री महादेव मंदिराचे भुमिपुजन सोहळा🚩

🔸तरुण तडफदार न्यूज । प्रशांत बोरकर🔸
🚩*हर हर महादेव*🚩  
आज महाशिवरात्र . अत्यंत पवित्र दिवस . अशा या पवित्र दिनी *संतभूमी रावेर* येथील स्टेशन रोड वरील *विश्वरूप नगर* येथील श्री महादेव मंदिराचे भमिपुजन सोहळा श्री *परमानंद गिरी महाराज* यांचे करकमलांनी करण्यात आला.या प्रसंगी मा. नगराध्यक्ष *श्री पद्माकर भाऊ महाजन,* नगराध्यक्ष श्री *भास्कर* *महाजन* , नगरसेवक श्री *राजेंद्र चौधरी,* श्री *दिलीप पाटील,* माऊली फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. श्री *संदिप* *पाटील* , आर्किटेक्ट श्री *सुरज पोतदार* , श्री *सचिन पाटील* , पोलीस पाटील श्री *विजय पाटील* हे मान्यवर उपस्थित होते. भूमिपुजन सोहळ्यास परिसरातील सर्व लहान थोर आबाल वृद्ध तसेच महिला वर्ग उपस्थित होता
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन पाटील, राजुशेठ पाटील, अजयशेठ पाटील, राजु पवार सर, पंडित पवार सर, सुमन महाजन, रमेश पाटील, संतोष श्रीखंडे, निलेश चौधरी, वैभव नेहते, पांडूरंग पाटील, दिलीप सोनवणे सर यांनी विशेष परिश्रम घेतले .

Thursday, February 12, 2026

🔸मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा🔸

🔸तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । आनंद बोरकर🔸
मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा
मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे जिल्ह्यातील वर्ष २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारुप आराखडे अंतिम करण्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. शासनाने ठरवून दिलेल्या वित्तीय मर्यादेपेक्षा अतिरिक्त निधीची मागणी या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याअध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्यमंत्र्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे आणि प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

तर विभागीय आयुक्त कार्यालयातून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, हेमंत रासणे, पुणे शहराचे महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

यावेळी यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, पालक सचिव व्ही. राधा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

या बैठकीत श्री. डुडी यांनी जिल्ह्यांच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना आणि प्रारुप आरखडयाबाबत दूरदृष्यप्रणालीद्वारे सादरीकरण केले.

CMOMaharashtra Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Chandrakant Patil Jaykumar Gore Dr. Neelam Gorhe Madhuri Misal @followers

#मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #जिल्हावार्षिकयोजना #पुणेजिल्हा #नियोजनबैठक #विकासआराखडा #पालकमंत्री #सुनेत्रापवार #लोकप्रतिनिधी #प्रशासन #Pune #DistrictPlanning #DevelopmentAgenda