Friday, September 5, 2025

प्रा डॉ महेंद्र सोनवणे यांना ब्लू स्टार इव्हेंट नाशिक या नामवंत संस्थे कडून आदर्श विद्यारत्न सन्मान 2025 पुरस्कार

रावेर । शशांक बोरकर । तरुण तडफदार न्यूज ।सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐंनपुर येथील प्रा डॉ महेंद्र सोनवणे यांना ब्लू स्टार इव्हेंट नाशिक या नामवंत संस्थे कडून आदर्श विद्यारत्न सन्मान 2025 पुरस्कार मिळाला असून याचे स्वरूप ट्रॉफी,मेडल आहे.सदर पुरस्कार ऑनलाइन पध्दतीने मिळाला आहे.
या बद्द्ल संस्थेचे अध्यक्ष मा. भागवतभाऊ पाटील, उपाध्यक्ष श्री.रामदास महाजन,चेअरमन मा.
श्री. श्रीराम पाटील, सचिव संजय भाऊ पाटील, सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने आणि सहकारी प्रा डॉ रेखा पाटील,प्रा. डॉ . एस ए पाटील, प्रा डॉ एस बी पाटील ,प्रा. डॉ.सतीष वैष्णव, प्रा.एच एम बाविस्कर, प्रा.व्ही.एच.पाटील, प्रा डॉ संदिप साळुंखे , प्रा.प्रदीप तायडे, प्रा.अक्षय महाजन, प्रा डॉ. पी आर महाजन , प्रा.कोळी, प्रा. अंकुर पाटील , परिसरातील सर्व नागरिक , विद्यार्थी यांनी मनापासून हार्दिक अभिनंदन केले आहे

Thursday, September 4, 2025

रावेर 'श्री ' विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी.....

रावेर । प्रशांत बोरकर, शशांक बोरकर । तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । 
दि.०६ सप्टेंबर २०२५ शनिवार रोजी श्री गणेशाची  विसर्जन मिरवणूक निघणार असून सदर मिरवणुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही व मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी मिरवणूक मार्गावरील स्वच्छता,सीसीटीव्ही कॅमेरे,दिवाबत्ती, पोलिस बंदोबस्त,बॅरिगेट वगैरे सर्व बाबींकडे प्रत्यक्ष लक्ष घालून या मार्गाची पाहणी करण्यासाठी  मा, डीवायएसपी अनिल बडगुजर साहेब फैजपूर, मा, तहसीलदार बंडूजी कापसे,  रावेर पोलीस स्टेशनचे पी.आय.डॉ.विशाल जयस्वाल, रावेर नगरपालिका मुख्याधिकारी गांगुर्डे साहेब,एम एस सी बी चे अधिकारी मुकेश ठाकरे,आरोग्य निरीक्षक चांगरे साहेब,युवराज गोयल,श्री पद्माकर भाऊ महाजन सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील,सुधाकर नाईक,शैलेंद्र अग्रवाल, मंडळाचे अध्यक्ष वगैरे सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी,मंडळाचे कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.*

Tuesday, September 2, 2025

बलवाडी ता. रावेर येथील श्री. मनोहर बाळू गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत यश

रावेर । शशांक बोरकर/ तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । 
सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील मराठी विभागातील माजी विद्यार्थी श्री. मनोहर बाळू गायकवाड रा. बलवाडी ता. रावेर, यांनी नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत यश मिळविले आहे. त्यांच्या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे त्यांनी शेतीचे आणि केळीचे गड वाहण्याचे काम करून सदर यश संपादन केले. त्यांच्या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने, प्रा डॉ महेंद्र सोनवणे, प्रा डॉ रेखा पाटील यांनी बुके देऊन सत्कार केला. यावेळी प्रा डॉ एस एन वैष्णव, प्रा. अक्षय महाजन आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.