Tuesday, September 2, 2025

बलवाडी ता. रावेर येथील श्री. मनोहर बाळू गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत यश

रावेर । शशांक बोरकर/ तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । 
सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील मराठी विभागातील माजी विद्यार्थी श्री. मनोहर बाळू गायकवाड रा. बलवाडी ता. रावेर, यांनी नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत यश मिळविले आहे. त्यांच्या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे त्यांनी शेतीचे आणि केळीचे गड वाहण्याचे काम करून सदर यश संपादन केले. त्यांच्या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने, प्रा डॉ महेंद्र सोनवणे, प्रा डॉ रेखा पाटील यांनी बुके देऊन सत्कार केला. यावेळी प्रा डॉ एस एन वैष्णव, प्रा. अक्षय महाजन आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Thanks
https://www.linkedin.com/in/tarun-tadafdar-news-002b4a1a5
https://taruntadafdarnews.wordpress.com/ https://mobile.twitter.com/TARUNTADAFDAR8 https://www.youtube.com/c/TARUNTADAFDARNEWS