Saturday, March 23, 2024

अॅडव्होकेट.उदय एम.सोनार यांची भारत सरकारच्या नोटरी वकील पदी नियुक्ती


अॅडव्होकेट.उदय एम.सोनार यांची भारत सरकारच्या नोटरी वकील पदी नियुक्ती झाली त्या निमित्ताने त्यांचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा - 
🔸शशांक बोरकर व्हिडिओ एडिटर , तरुण तडफदार न्यूज
🔸वैश्य सोनार समाज रावेर💐💐🌹🌹💐💐🌹🌹👌👌✌️✌️

ओबीसी जनकल्याण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांची निवड

ओबीसी जनकल्याण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांची निवड
🔸 मुंबई । तरुण तडफदार प्रतिनीधी । शशांक बोरकर🔸
महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विचारवंत निर्भीड पत्रकार ओबीसी आदिवासी चळवळीचे तरुण तडफदार नेते श्री प्रशांत बोरकर यांची ओबीसी जनकल्याण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली आहे. 
आज रोजी ओबीसी जनकल्याण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार यादव सेसाई यांनी भोपाल येथून आज श्री प्रशांत बोरकर यांची निवड जाहीर केली 
श्री प्रशांत बोरकर यांनी समाजाच्या विविध घटकांच्या साठी कार्य केलेले आहे

ओबीसी विद्यार्थ्यांना वस्तीगृह सुरू व्हावे ओबीसी विद्यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू करण्यात यावी ओबीसी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र साठी अशा अनेक प्रकारच्या बाबतीत श्री प्रशांत बोरकर हे केल्या 35 वर्षापासून पाठपुरावा करीत आहेत.
ओबीसी च्या विकासासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ओबीसी आरक्षण परत मिळण्यासाठी तसेच ओबीसींसाठी छोट्या छोट्या जातींना न्याय मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना लागू करण्यासाठीओबीसी चे राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी लढा उभारणार असल्याचे महाराष्ट्रात एक मोठे ताकद निर्माण करणार असल्याचे श्री प्रशांत बोरकर यांनी नियुक्तीच्या वेळी म्हटले आहे

रावेर आगारात तारकपूर (अहमदनगर) आगाराची अयोध्या एक्सप्रेस मधील प्रवाश्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वतीने 🚩चहा पाण्याची व्यवस्था तसेच कामगार सेनेच्या माध्यमातून डॉ. संदिप पाटील, रावेर यांचे सौजन्याने जेवण

🔸रावेर । तरुण तडफदार प्रतिनीधी । प्रशांत बोरकर🔸
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रावेर आगारात आज दिनांक 21/03/2024 रोजी तारकपूर (अहमदनगर) आगाराची *अयोध्या एक्सप्रेस* अयोध्या येथून दर्शन घेऊन तारकपूर येथे परतीचा प्रवास करण्यासाठी बऱ्हाणपूर मार्गे रावेर आगारात डिझेल भरण्यासाठी जय श्रीराम च्या जयघोषात येत असतांना *महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या🚩 कार्यकर्त्यांना माहीत झाले असता, तत्परतेने बसमधील सर्व भाविकांसाठी तसेच बस वरील रा.प. कर्मचाऱ्यांसाठी रावेर आगारातील दत्त मंदिर येथे चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. 
            त्याचबरोबर भर दुपारची वेळ असल्याने तसेच सर्व प्रवाशांचे जेवण अद्याप बाकी असल्याचे लक्षात घेऊन कामगार सेनेच्या माध्यमातून तत्परतेने लालपरी मधील सर्व प्रवाशांसाठी हॉटेल मानस गार्डन, रावेर येथे डॉ. संदिप पाटील, संचालक माऊली हॉस्पिटल, रावेर यांचे सौजन्याने जेवण ठेवण्यात आले. यावेळी सर्व प्रवाशांनी शेवभाजी, पोळी, भात, जिलेबी याचा आस्वाद घेत रावेरकरांचे आभार मानले. सर्व भाविकांसाठी पाहुणचार करतांना एक वेगळा आनंद वाटत होता.
            या सर्व कार्यक्रमासाठी श्री. आर.के. पाटील-राज्य चिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना यांचे मार्गदर्शनानुसार रावेर आगारातील श्री. मधुकर चौधरी, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना, श्री. अमजद तडवी, आगार सचिव , रावेर आगार,, श्री. शाम भामरे- रावेर तालुका शिवसेना कार्यकर्ते , श्री किरण वाणी- सदस्य कामगार सेना, श्री. योगेश जोशी, वाहतूक नियंत्रक यांनी परिश्रम घेतले. याकामी श्री. विजय पाटील साहेब आगार व्यवस्थापक, रावेर आगार यांचे सूचनेनुसार श्री. विश्वजित तेली- सहा.कार्यशाळा अधिक्षक, श्री. संदिप तायडे, सहा.वाह. अधिक्षक, कु.कोकिळा काळे मॅडम- वरिष्ठ लिपिका, सुरेखा तायडे मॅडम लिपिका, उपस्थित कार्यशाळा कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लागले. याप्रसंगी महाराष्ट्र एस. टी. कामगार सेने तर्फे श्री. शाम भामरे, शिवसेना कार्यकर्ते यांनी सर्वांचे आभार मानले....

 *जय महाराष्ट्र* 

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Wednesday, February 14, 2024

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक वैश्यसोनार फांउडेशन नाशिकचे संस्थापक कै.प्रकाश विश्वनाथ बनतोडे नासिक यांचे दुःखद निधन

शोक संदेश

तरुण तडफदार न्यूज I
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक
 वैश्यसोनार फांउडेशन नाशिकचे संस्थापक 
*कै. प्रकाश विश्वनाथ बनतोडे* नासिक 
यांचे वयाच्या 74 व्या वर्षी दिर्घ आजाराने आज सकाळी 9:55 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, मुलगी, जावाई असा परिवार आहे. देव त्यांना या दुःखातुन सवरण्याची शक्ती देवो. 
*भावपूर्ण श्रद्धांजली* .
प्रकाश बनतोडे मामा यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये सेवा केली मूळचे अमळनेरचे असलेले श्री प्रकाश बनतोडे यांचे सध्याचे निवासस्थान नासिक असून त्यांनी धुळे जळगाव जिल्हा तसेच रत्नागिरी पोलीस मुख्यालय येथे सेवा दिली त्यांची दोन्ही मुलं आता पोलीस निरीक्षक म्हणून रवी अतुल बनतोडे म्हणून पोलीस सेवेत कार्यरत आहेत श्री प्रकाश बनतोडे यांनी पोलीस सेवेत येण्यासाठी मार्गदर्शन प्रशिक्षण दिले त्यांचा मोठा शिष्य चाहता वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे रावेर येथून अनेक मुलांना बेरोजगार तरुणांना पोलीस खात्यामध्ये पाठवले असता त्यांच्या प्रशिक्षणाची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था प्रकाश मामा हे करत असत.
 ओबीसी तसेच सुवर्णकार समाजाचे हानी झालेली आहे त्यांना आमच्या विविध समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 प्रशांत बोरकर प्रदेश अध्यक्ष भारतीय किसान संघटन*शोक संदेश*

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक
 वैश्यसोनार फांउडेशन नाशिकचे संस्थापक 
*कै. प्रकाश विश्वनाथ बनतोडे* नासिक 
यांचे वयाच्या 74 व्या वर्षी दिर्घ आजाराने आज सकाळी 9:55 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, मुलगी, जावाई असा परिवार आहे. देव त्यांना या दुःखातुन सवरण्याची शक्ती देवो. 
*भावपूर्ण श्रद्धांजली* .
प्रकाश बनतोडे मामा यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये सेवा केली मूळचे अमळनेरचे असलेले श्री प्रकाश बनतोडे यांचे सध्याचे निवासस्थान नासिक असून त्यांनी धुळे जळगाव जिल्हा तसेच रत्नागिरी पोलीस मुख्यालय येथे सेवा दिली त्यांची दोन्ही मुलं आता पोलीस निरीक्षक म्हणून रवी अतुल बनतोडे म्हणून पोलीस सेवेत कार्यरत आहेत श्री प्रकाश बनतोडे यांनी पोलीस सेवेत येण्यासाठी मार्गदर्शन प्रशिक्षण दिले त्यांचा मोठा शिष्य चाहता वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे रावेर येथून अनेक मुलांना बेरोजगार तरुणांना पोलीस खात्यामध्ये पाठवले असता त्यांच्या प्रशिक्षणाची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था प्रकाश मामा हे करत असत.
 ओबीसी तसेच सुवर्णकार समाजाचे हानी झालेली आहे त्यांना आमच्या विविध समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 प्रशांत बोरकर प्रदेश अध्यक्ष भारतीय किसान संघटन

रावेरच्या जुन्या राजकारणातील एक युवा जीवन हरवले

रावेरच्या जुन्या राजकारणातील एक युवा जीवन हरवले
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸


रावेरच्या राजकारणातील छोट्या समाजातील एक कर्तृत्ववान मेहनत करणारे व्यक्तिमत्व म्हणजे जीवनलाल लोहार रावेर चा रथ ओढायचा असो की मुंबईला जाऊन जनतेच्या नेत्यांच्यासाठी साथ देणारा कार्यकर्ता अशी ओळख त्यांची होती काँग्रेसच्या काळात बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांना संरक्षण देणारा त्यांच्यासाठी रोखठोक काम करणारा अशी भूमिका घेणारा .
रावेर चा रथ भरधाव होत असताना लोकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मांडीचे ब्रेक करून अडवणारे रोखणारे त्यात जखमी होणारे जीवन आज नाही हे न पटणारी गोष्ट आहे .

श्री जीवन लोहार यांच्याबरोबर दोन निवडणुका पीपल बँकेच्या लढवल्या.सकाळी चार वाजेपासून प्रत्येक गावागावामध्ये जळगाव जिल्ह्यात आणि बऱ्हाणपूरच्या काही भागांमध्ये गावोगाव घरघर पिंजून काढली होती एका मोटरसायकल वर एका लोकसभेचा मतदारसंघ पिंजून काढावा तसे आम्ही घरोघर लोकांना भेटी दिल्या होत्या त्यावेळी त्यांच्या मोटरसायकलवर सकाळी चार वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत सातत्याने लोकांची जनसंपर्क होत होता अनेक लोक ना ओळखणारे संबंध ठेवणारे जीवन सेट होते मला लोक नावाने ओळखत होते परंतु त्यांच्यामुळे असंख्य लोकांचा संपर्क झाला अशा निवडणुकांमधून जनतेशी विवेक पातळीवर चर्चा ही होत असे शेतकऱ्यांना भेटण्याची वेळ सकाळीच असते हे पहाटे असते हे समजून सांगून मला सोबत घेऊन फिरणारे जीवन शेठ आज आपल्यात नाहीत याचे फार मोठे दुःख आहे असे कितीतरी कार्यकर्ते आपल्या छोट्या समाजामध्ये मोठे काम करणाऱ्या आहेत परंतु त्यांना योग्य ती संधी साथ न मिळाल्याने बाहेरच्या शहरांकडे पुणे मुंबईकडे जावे लागत आहे हेही मोठे दुःख आहे सातत्याने संघर्ष हा रावेर परिसरातील कार्यकर्त्यांच्या नशिबी आला आहे कुठेतरी तळमळणारे धडपडणाऱ्या कर्त्यांची कार्यकर्त्यांचं चीज व्हावं रावेरच्या भूमीमध्ये काहीतरी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा त्यांना संधी मिळावी हीच या प्रकरणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करताना मत व्यक्त करतो .💐रावेर मधील धडपडणारा एक जीवन संपले आहे हे जड अंतर करण सांगतो😢🙏🕯️✍️
प्रशांत बोरकर
8208361187

Thursday, June 15, 2023

रावेर शहरावर सी सी टिव्ही ची नजर,मान्यवर यांचे उपस्थितीत शुभारंभ taruntadafdarnews/shashankborkar


रावेर येथे आज रोजी सीसीटीव्ही कॅमेरा व विश्रामगृहाचे उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी पोलीस अधीक्षक एम राजकुमार प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी श्री चव्हाण तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पंकज आशिया. उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे रावेर प्रांत कैलास कलगड फैजपूर पोलीस निरीक्षकतहसीलदार बंडू कापसे साहेब. कैलास नागरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मान्यवर मध्ये शिवसेनेचे  प्रल्हाद महाजन भारतीय किसान संघटनेचे श्री प्रशांत बोरकर भाजपाचे पद्माकर महाजन ऍडव्होकेट योगेश गजरे अशोक शिंदे नितीन पाटील अनिल शेठ अग्रवाल शरद अग्रवाल तसेच असंख्य शांतता कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते मान्यवरांची भाषणे यावेळी झाली जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक श्री राजकुमार यांनी म्हटले की तरुणांनी आपला सदुपयोग आपल्या कॅरियर व अभ्यासाकडे लक्ष द्यावे कोणत्याही प्रकारे सोशल मीडियावर चुकीचे संदेश देऊन आपले आयुष्य बरबाद करू नये आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांकडे लक्ष देऊन ते कोणत्या ग्रुप मध्ये आहेत याकडे लक्ष द्यावे तसेच आता सीसीटीव्ही मार्फत आरोपी यांना पकडण्यात यश मिळेल त्याबरोबर जे निरपरात आहेत ज्यांचे नावे मुद्दामून टाकले जातात अशा लोकांना सुद्धा संरक्षण मिळेल असे पोलीस अधीक्षक यावेळी सांगितले यावेळी मान्यवरांचे भाषण झाले त्यात दिलीप कांबळे पद्माकर महाजन आदींचा भाषणे झाली यावेळी रायगडावर प्रात्यक्षिक करणाऱ्या मुलींचा सत्कार करण्यात आला तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याबद्दल मुख्याधिकारी श्री मालेगावें मॅडम तसेच कॉन्टॅक्ट प्रफुल्ल तसेच सुधाकर नाईक आणि मुन्ना अग्रवाल यांनी मदत केल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आला

Monday, March 27, 2023

ऐनपूर महाविद्यालयात सॉफ्ट स्किल ट्रेनिंग वर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

तरुण तडफदार न्यूज शशांक बोरकर

ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील ट्रेनिंग एंड प्लेसमेंट सेल तर्फे आयक्यूएसी व माजी विद्यार्थी मंडळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय सॉफ्ट स्किल ट्रेनिंग कार्यशाळेचे आयोजन दि. १८/०३/२०२३ शनिवार रोजी करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. के. जी. कोल्हे हे होते. कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. डी. बी. पाटील व प्रा. नरेंद्र मुळे हे उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. डी. बी. पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमाचे महत्व समजून सांगितले. विद्यार्थ्यांनी अश्या कार्यक्रमांमधून आपल्या स्किलचा विकास केला पाहिजे असे प्रा. डॉ. के. जी. कोल्हे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. प्रथम सत्रात प्रा. मुळे यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किलचा विकास आपल्यामध्ये का केला पाहिजे तसेच तो कसा केला पाहिजे हे समजावून सांगितले. व्दितीय सत्रात डॉ. डी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमधून व लहान लहान मनोरंजात्मक उपक्रमांमधून सॉफ्ट स्किलचा विकास कसा करता येतो हे सांगितले. कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेतला. या कार्यशाळेत एकूण ५० विद्यार्थी सस्भागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. जयंत नेहेते यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. बी. पाटील, प्रा. डॉ. जयंत नेहेते, प्रा. एच. एम. बाविस्कर, डॉ. एस. एन. वैष्णव, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. संकेत चौधरी, श्री नितिन महाजन, श्रेयश पाटील, अनिकेत पाटील, हर्षल पाटील तसेच सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.

Sunday, March 26, 2023

उद्योगमंत्री श्री श्याम रजक जी यांच्या सोबत आज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली

तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । शशांक बोरकर

बिहार RJD पक्षाचे सेक्रेटरी, पटणा शहर मधून सलग सहा वेळा आमदार राहिलेले (३० वर्ष) श्री लालू प्रसाद यादव जी, श्री तेजस्वी यादव जी यांचे निकटर्तीय तथा उद्योगमंत्री श्री श्याम रजक जी यांच्या सोबत आज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली..
यावेळी उद्धव साहेब व श्याम रजक यांच्यामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर व भविष्यातील राजकीय वाटचाली बाबत चर्चा झाली...
आजही भेट भविष्यातील राजकीय नांदी ठरेल येवढं नक्की.. ही भेट महत्वपूर्ण असेल या पूर्वी आदित्य ठाकरे जी बिहार चे उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भेटुन आले होतेश्री रजक यानी.. मुंबई महानगरपालिकाबाबत ही याभेटीत त्यांनी चर्चा केली..
त्यांचे सोबत प्रदेश अध्यक्ष श्री विजय कंडारे जी अन्य सेना राजद कार्यकर्ते होते
  

प्रेस शी बोलतना 
प्रशांत बोरकर राज्य प्रवक्ता और महाराष्ट्र महासचिव
राष्ट्रीय जनता दल 
यानी माहिती दिली।

🚩रावेर येथे संत श्री झुलेलाल महाराज जयंती चेट्री चंड पर्व मोठ्या उत्साहात साजरा🚩

तरुण तडफदार न्यूज

🚩रावेर येथे संत श्री झुलेलाल महाराज जयंती चेट्री चंड पर्व मोठ्या उत्साहात साजरा🚩



रावेर तरुण तडफदार प्रातिनिधी शशांक बोरकर

रावेर येथे सिंधी समाजाच्या वतीने संत श्री झुलेलाल महाराज जयंती निमित्त चेट्री चंड पर्व मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला . सकाळी समाजाचे युवा तरुणांनी रावेर शहरातून मोटर सायकल रॅली काढून रावेरकरांचे लक्ष वेधले . तसेच संत श्री झुलेलाल महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . संध्याकाळी रावेर शहराच्या प्रमुख मार्गावरून संत झुलेलाल महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. सर्व सिंधी समाज बांधव दिवसभर आपली दुकाने बंद करून विविध कार्यक्रमांत सहभागी झाले होते . तसेच मिरवणूकी मध्ये सुद्धा मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते .

Tuesday, March 21, 2023

🔸कर्मचाऱ्यांचे संप मागे निर्णयाचे स्वागत, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे सुरु - मुख्यमंत्री🔸

*🔸कर्मचाऱ्यांचे संप मागे निर्णयाचे स्वागत, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे सुरु - मुख्यमंत्री🔸*


*@TARUNTADAFDARNEWS*

*युट्युब व्हिडिओ पाहण्यासाठी निळ्या लिंकला वलीक करा👇👇👇👇*

https://youtu.be/ESn8agridO8

*🔴असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या तरुण तडफदार न्यूज TARUNTADAFDARNEWS चॅनेलला Subscribe करा धन्यवाद !*🔴

https://youtube.com/c/TARUNTADAFDARNEWS