पोलीस स्टेशन रावेर येथील अपराध क्रमांक 359/25 कलम 303(2) बी एन एस मध्ये एक होंडा कंपनीची मोटरसायकल किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये चोरी गेली होती सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी विरुद्ध वर नमूद गुन्हा दाखल झाला होता तरी पोलीस स्टेशन रावेर येथील गुन्हे तपास पथकाने सदर अज्ञात आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे लालसिंग करसिंग तडोले वय तीस वर्ष राहणार बोरी बुजुर्ग जनकपुरा मध्य प्रदेश यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपी कडून गुन्ह्य़ातील चोरीस गेलेले वाहन जप्त केले आहे सदरची कारवाई ही माननीय श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी सर पोलीस अधीक्षक जळगाव, माननीय श्री अशोक नखाते सर, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, माननीय श्री अनिल बडगुजर सर पोलीस उपविभागीय अधिकारी फैजपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री विशाल जयस्वाल पोलीस निरीक्षक पोस्ट रावेर तसेच तपास पथकातील अंमलदार श्री कल्पेश आमोदकर नाईक पोलीस शिपाई, पोलीस शिपाई प्रमोद पाटील, पोलीस शिपाई विशाल पाटील, पोलीस शिपाई श्रीकांत चव्हाण, पोलीस शिपाई सुकेश तडवी यांनी केली असून पुढील तपास पोलीस नाईक श्री किशोर सपकाळे हे करीत आहे .
No comments:
Post a Comment
Thanks
https://www.linkedin.com/in/tarun-tadafdar-news-002b4a1a5
https://taruntadafdarnews.wordpress.com/ https://mobile.twitter.com/TARUNTADAFDAR8 https://www.youtube.com/c/TARUNTADAFDARNEWS