Friday, September 5, 2025

प्रा डॉ महेंद्र सोनवणे यांना ब्लू स्टार इव्हेंट नाशिक या नामवंत संस्थे कडून आदर्श विद्यारत्न सन्मान 2025 पुरस्कार

रावेर । शशांक बोरकर । तरुण तडफदार न्यूज ।सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐंनपुर येथील प्रा डॉ महेंद्र सोनवणे यांना ब्लू स्टार इव्हेंट नाशिक या नामवंत संस्थे कडून आदर्श विद्यारत्न सन्मान 2025 पुरस्कार मिळाला असून याचे स्वरूप ट्रॉफी,मेडल आहे.सदर पुरस्कार ऑनलाइन पध्दतीने मिळाला आहे.
या बद्द्ल संस्थेचे अध्यक्ष मा. भागवतभाऊ पाटील, उपाध्यक्ष श्री.रामदास महाजन,चेअरमन मा.
श्री. श्रीराम पाटील, सचिव संजय भाऊ पाटील, सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने आणि सहकारी प्रा डॉ रेखा पाटील,प्रा. डॉ . एस ए पाटील, प्रा डॉ एस बी पाटील ,प्रा. डॉ.सतीष वैष्णव, प्रा.एच एम बाविस्कर, प्रा.व्ही.एच.पाटील, प्रा डॉ संदिप साळुंखे , प्रा.प्रदीप तायडे, प्रा.अक्षय महाजन, प्रा डॉ. पी आर महाजन , प्रा.कोळी, प्रा. अंकुर पाटील , परिसरातील सर्व नागरिक , विद्यार्थी यांनी मनापासून हार्दिक अभिनंदन केले आहे

Thursday, September 4, 2025

रावेर 'श्री ' विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी.....

रावेर । प्रशांत बोरकर, शशांक बोरकर । तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । 
दि.०६ सप्टेंबर २०२५ शनिवार रोजी श्री गणेशाची  विसर्जन मिरवणूक निघणार असून सदर मिरवणुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही व मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी मिरवणूक मार्गावरील स्वच्छता,सीसीटीव्ही कॅमेरे,दिवाबत्ती, पोलिस बंदोबस्त,बॅरिगेट वगैरे सर्व बाबींकडे प्रत्यक्ष लक्ष घालून या मार्गाची पाहणी करण्यासाठी  मा, डीवायएसपी अनिल बडगुजर साहेब फैजपूर, मा, तहसीलदार बंडूजी कापसे,  रावेर पोलीस स्टेशनचे पी.आय.डॉ.विशाल जयस्वाल, रावेर नगरपालिका मुख्याधिकारी गांगुर्डे साहेब,एम एस सी बी चे अधिकारी मुकेश ठाकरे,आरोग्य निरीक्षक चांगरे साहेब,युवराज गोयल,श्री पद्माकर भाऊ महाजन सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील,सुधाकर नाईक,शैलेंद्र अग्रवाल, मंडळाचे अध्यक्ष वगैरे सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी,मंडळाचे कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.*

Tuesday, September 2, 2025

बलवाडी ता. रावेर येथील श्री. मनोहर बाळू गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत यश

रावेर । शशांक बोरकर/ तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । 
सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील मराठी विभागातील माजी विद्यार्थी श्री. मनोहर बाळू गायकवाड रा. बलवाडी ता. रावेर, यांनी नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत यश मिळविले आहे. त्यांच्या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे त्यांनी शेतीचे आणि केळीचे गड वाहण्याचे काम करून सदर यश संपादन केले. त्यांच्या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने, प्रा डॉ महेंद्र सोनवणे, प्रा डॉ रेखा पाटील यांनी बुके देऊन सत्कार केला. यावेळी प्रा डॉ एस एन वैष्णव, प्रा. अक्षय महाजन आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Sunday, August 31, 2025

होंडा मोटरसायकल चोर रावेर पोलीसांच्या ताब्यात

रावेर । प्रशांत बोरकर, शशांक बोरकर । तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी ।

 पोलीस स्टेशन रावेर येथील अपराध क्रमांक 359/25 कलम 303(2) बी एन एस मध्ये एक होंडा कंपनीची मोटरसायकल किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये चोरी गेली होती सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी विरुद्ध वर नमूद गुन्हा दाखल झाला होता तरी पोलीस स्टेशन रावेर येथील गुन्हे तपास पथकाने सदर अज्ञात आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे लालसिंग करसिंग तडोले वय तीस वर्ष राहणार बोरी बुजुर्ग जनकपुरा मध्य प्रदेश यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपी कडून गुन्ह्य़ातील चोरीस गेलेले वाहन जप्त केले आहे सदरची कारवाई ही माननीय श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी सर पोलीस अधीक्षक जळगाव, माननीय श्री अशोक नखाते सर, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, माननीय श्री अनिल बडगुजर सर पोलीस उपविभागीय अधिकारी फैजपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री विशाल जयस्वाल पोलीस निरीक्षक पोस्ट रावेर तसेच तपास पथकातील अंमलदार श्री कल्पेश आमोदकर नाईक पोलीस शिपाई, पोलीस शिपाई प्रमोद पाटील, पोलीस शिपाई विशाल पाटील, पोलीस शिपाई श्रीकांत चव्हाण, पोलीस शिपाई सुकेश तडवी यांनी केली असून पुढील तपास पोलीस नाईक श्री किशोर सपकाळे हे करीत आहे .

Friday, August 29, 2025

तरुण तडफदार ची दखल.. प्रशांत बोरकर यांच्या मागणीनुसार तहसीलदार यांच्या मध्यस्थीमुळे कामगार खात्याची दखल हजारो महिलांना भांडी मिळणार

रावेर । शशांक बोरकर । तरुण तडफदार न्यूज ।
तरुण तडफदार ची दखल.. प्रशांत बोरकर यांच्या मागणीनुसार तहसीलदार यांच्या मध्यस्थीमुळे कामगार खात्याची दखल हजारो महिलांना भांडी मिळणार
रावेर यावल तालुक्यामध्ये भांडे वाटप प्रकरणी बांधकाम मजूर महिलांना गेल्या पंधरा दिवसापासून फिरवा फिरू केली जात होती त्या संदर्भामध्ये प्रशांत बोरकर यांनी सोशल मीडियावर आणि संबंधितांकडे आवाज उठवला होता त्याची दखल घेऊन लवकरात भांडे वाटप होणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहे
रावेरचे नायब तहसीलदार श्री संजय तायडे यांच्याशी भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कामगार तसेच प्रवासी हक्क चळवळीचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी चर्चा केली होती या संबंधांमध्ये तरुण तडफदार ने तसेच सोशल मीडियावर प्रशांत बोरकर यांनी आवाज उठवला होता त्या संदर्भामध्ये कामगार निरीक्षक जितेंद्र पवार महाराष्ट्र शासन यांनी लवकरात भांडे वाटप करण्याचे जाहीर केलेले आहे
ओबीसी जनकल्याण संघाचे प्रदेशाध्यक्ष कामगार नेते
प्रशांत बोरकर यांच्या मागणीनुसार आणि तहसील दार कार्यालयाच्या मध्यस्थींमुळे हजारो महिलांना न्याय मिळाल्याबद्दल ओबीसी जनकल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष श्री संजय चौधरी कार्यकर्ते वसंत महाजन अशोक पाटील मनोहर शेठ लोहार आधी असंख्य कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे व प्रशांत बोरकर साहेबांचे धन्यवाद व्यक्त केलेले आहे

Tuesday, August 26, 2025

सरदार जी .जी .हाय .व कनिष्ठ महाविद्यालय ,रावेर येथे गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप _______

 रावेर । प्रशांत बोरकर । तरुण तडफदार न्यूज प्रतिनिधी ।
सरदार जी .जी .हाय .व कनिष्ठ महाविद्यालय ,रावेर येथे गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप _______
( रावेर) येथील रावेर शिक्षण संवर्धक संघ संचलित सरदार जी .जी .हाय. व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रावेर शिक्षण संवर्धक संघाचे सन्माननीय संचालक मा. श्री .महेश अत्रे हे होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा .श्री .देवेंद्र मिसर, उपाध्यक्ष मा. डॉ .राजेंद्रआठवले, चेअरमन मा. श्री. शितल पाटील, सचिव मा. श्री .अक्षय अग्रवाल ,संचालक मा .श्री .शैलेंद्र कुमार देशमुख ,मा. श्री .संतोषशेठ अग्रवाल ,मा .श्री. तुषार मानकर, मा .श्री. विजयलाल लोहार ,संस्थेचे सहसचिव मा .श्री. बी .आर. महाजन उपस्थित होते .तसेच सौ. के. एस. ए.हाय . व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती . नीलम पुराणिक उपस्थित होत्या. संस्थेच्या व परिसरातील काही दात्यांनी आपल्या स्वखर्चातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य म्हणजेच स्कूल बॅग व वह्यांचा सेट या स्वरूपात मदत केली. यावेळी एकूण 85 कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप दात्यांच्या शुभहस्ते करण्यात आले .या दात्यांमध्ये सौ .लीना देशमुख ,सौ .प्रतिभा पाटील, श्री .भास्कर महाजन( रावेर),श्री. कैलास कोळी (मोरगाव) ,श्री. विजय महाजन (चोरवड), श्री. सुधाकर नाईक (रावेर ),तसेच संस्थेचे संचालक श्री .संतोष शेठ अग्रवाल ,श्री .अक्षय अग्रवाल, श्री. महेश अत्रे यांचा समावेश आहे. "दिलेल्या मदतीचा विद्यार्थ्यांनी योग्य उपयोग करून घ्यावा ,कॉपी करू नये व जीवनात आपले उद्दिष्ट साध्य करावे "असे मार्गदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. श्री. राजेंद्रजी आठवले यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक मा. श्री .महेश अत्रे यांनी देखील आपल्या अध्यक्षीय भाषणातून या उपक्रमाचे अभिनंदन व कौतुक केले .याप्रसंगी मा .संचालक तुषार मानकर यांना जिल्हास्तरीय फोटोग्राफीमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले .या प्रसंगी सरदार जी. जी .हाय .व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा .श्री .आर .आर .पाटील, उपमुख्याध्यापक प्रा .श्री .एन. जे .पाटील ,उपप्राचार्य प्रा .श्री. शैलेश राणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा .श्री .व्ही. व्ही. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. के . ए.नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सौ.आर. बी. सरोदे यांनी केले .यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Saturday, August 23, 2025

रावेर रेल्वे प्रवासी मित्रांतर्फे रावेर स्टेशन वर दानापूर पुणे गाडी चे जोरदार स्वागत केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे तसेच प्रशांत बोरकर यांचे शेकडो रावेर प्रवासी मित्रांची उपस्थिती

[23/08/25 l शशांक बोरकर । तरुण तडफदार न्यूज ] 

रावेर रेल्वे प्रवासी मित्रांतर्फे रावेर स्टेशन वर दानापूर पुणे गाडी चे जोरदार स्वागत केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे तसेच प्रशांत बोरकर यांचे शेकडो रावेर प्रवासी मित्रांची उपस्थिती 
रावेर
आज रोजी दानापूर पुणे रेल्वे गाडीच्या थांब्याच्या प्रसंगी रावेर रेल्वे प्रवासी मित्र संघाचे कार्यकर्ते रावेर बुऱ्हानपूर संघर्ष समितीचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते यावेळी प्रवासी नेते श्री प्रशांत बोरकर श्री संजय चौधरी बुऱ्हाणपूर येथील डॉक्टर अनसारी डॉक्टर फारूक श्री रामकुमार अग्रवाल तसेच रावेरचे वसंत महाजन शशांक बोरकर सुभाष अकोले डीडी वाणी संजय साखळकर नरेंद्र वाणी गणेश चौधरी जितू लोणारी मनोहरशेठ लोहार अशोक छोटू पाटील रामकृष्ण पाटील कासार काका रावेर प्रवासी मित्र ग्रुपचे शेकडो कार्यकर्ते तसे दिव्यांग संघटनेचे संजय बुवा रजनीकांत बारी हरणकर आधी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते या प्रसंगी बुऱ्हानपूरच्या संघटनेने तसेच दिव्यांग संघटनेने तसेच विविध संघटनेने प्रवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांचे स्वागत सत्कार केला

रावेर येथे दानापूर पुणे गाडीचा चालक यांचे स्वागत रावेर प्रवासी मित्र संघटनेचे श्री प्रशांत बोरकर यांनी केले याप्रसंगी भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत छोटेखाणी कार्यक्रम प्रवाशांचा झाला त्याप्रसंगी सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे स्वागत रेल्वे अधिकारी यांनी केले तसेच आमदार अमोल जावळे भाजपाचे कार्यकर्ते पद्माकर महाजन सुरेश धनके नितीन पाटील आदी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आणि रेल्वे बाबत आणि बुऱ्हानपूर अंकलेश्वर हायवे बाबत चाललेल्या चर्चेबाबत माहिती दिली याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवासी संघटनेचे श्री प्रशांत बोरकर यांनी केले आणि रेल्वे स्टेशनवर चाललेल्या उपक्रमांची माहिती दिली
 बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश प्रवासी रेल्वे संघर्ष समितीच्या कार्यकर्ते डॉक्टर अन्सारी रामकुमार अग्रवाल डॉक्टर फारूक यांनी आज रोजी प्रवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांचा सत्कार केला

Friday, August 22, 2025

🔴 व्हाट्सअप ग्रुप मुळे थांबली पुन्हा रावेरला रेल्वे गाडी महाराष्ट्र मध्ये प्रदेश मध्ये एकच चर्चा 🔴 🔸प्रशांत बोरकर मित्रमंडळीचा सातत्याने पाठपुरावा🔸

रावेर । शशांक बोरकर । तरुण तडफदार न्यूज ।
व्हाट्सअप ग्रुप मुळे थांबली पुन्हा रावेरला रेल्वे गाडी 
महाराष्ट्र मध्ये प्रदेश मध्ये एकच चर्चा प्रशांत बोरकर मित्रमंडळीचा सातत्याने पाठपुरावा


रावेर रेल्वे स्टेशन सह महाराष्ट्र मध्य प्रदेशातील विविध रेल्वे गाड्या बस सेवा सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणारे श्री प्रशांत बोरकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून लेख लिहून त्याबरोबर निवेदन देऊन सातत्याने गेल्या 30 वर्षापासून मागणी केलेली आहे त्यात त्यांना सातत्याने यश लाभलेले आहे कोणतेही पद पैसा प्रसिद्ध न घेता रावेर परिसरातील जनतेसाठी काम करणारे एक अभिनव अनोखे व्यक्ती मात्र आहे त्यांच्या मागण्या संदर्भात त्यांनी गाणे सुद्धा तयार केले ते प्रचंड लोकप्रिय झालं लाखो लोकांनी ते व्हायरल झाले त्या गाण्यात चा पुन्हा एकदा आस्वाद घ्या रावेर रेल्वे प्रवासी मित्र या ग्रुपला प्रोत्साहन द्या धन्यवाद रावेर रेल्वे प्रवासी ग्रुपला ग्रुप मध्ये दिलीप पाटील संजय चौधरी रशीद तडवी वसंत महाजन दामोदरे दिलीप भालेराव सुभाष अकोले निलेश बोरा इस्माईल खाटीक रामकृष्ण चौधरी याचबरोबर रावेरचे असंख्य नागरिक प्रवासी नोकरदार विद्यार्थी रिक्षाचालक यांच्या सदिच्छा मागण्यामुळे रावेर रेल्वे स्टेशनवर आरक्षण केंद्र अमृतभारत स्टेशन तसेच विविध सवलती रावेर स्टेशनला प्राप्त होत आहेत अशा संघटित मागणीमुळे एका व्हाट्सअप ग्रुप मुळे रावेरला तसेच महाराष्ट्र मध्य प्रदेश ला अनेक रेल्वे सेवा बस सेवा मिळाली याची एकच चर्चा आहे

Thursday, August 21, 2025

सांसद ज्ञानेश्वर पाटील ने पीएम मोदी जी से की शिष्टाचार भेंट

🔸खंडवा जलगाँव । प्रशांत बोरकर । तरुण तडफदार न्यूज🔸
सांसद ज्ञानेश्वर पाटील ने पीएम मोदी जी से की शिष्टाचार भेंट 
*संसदीय क्षेत्र के सर्वांगीण विकास के लिए विशेष पैकेज देने का किया अनुरोध* 

- विकास का वादा ज्ञानेश्वर दादा
- संसदीय क्षेत्र के विकास की और बढ़ते कदम

नई दिल्ली । आज खंडवा लोकसभा सांसद ज्ञानेश्वर पाटील ने नई दिल्ली में यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी से शिष्टाचार भेंट कर मार्गदर्शन व आशीर्वाद प्राप्त किया।सांसद ने खंडवा संसदीय क्षेत्र के सर्वांगीण विकास के लिये कृषि, पर्यटन और उद्योगो के स्थापना हेतु विशेष पैकेज स्वीकृत करने का अनुरोध किया। प्रधानमंत्री मोदी जी ने आश्वस्त किया इन सभी मांगों पर सार्थक निर्णय लिया जाएगा।
 *किसानों के लिए होंगी बड़ी सौगात बढ़ेंगे रोजगार के अवसर* 
सांसद श्री पाटील ने बताया कि संसदीय क्षेत्र (खंडवा/बुरहानपुर/खरगोन/देवास) कृषि आधारित अर्थव्यवस्था का एक प्रमुख केंद्र है। यहां केला, अरबी, सोयाबिन, प्याज, मिर्च तथा कपास का बड़े पैमाने पर उत्पादन होता है। उन्होंने कहा कि प्रसंस्करण और भंडारण की उचित व्यवस्था न होने के कारण किसानों को अपनी उपज का सही मूल्य नहीं मिल पाता। इस समस्या को हल करने के लिए मेरे संसदीय क्षेत्र में एक आधुनिक मिर्च प्रसंस्करण इकाई (फूड प्रोसेसिंग यूनिट) और मिर्च अनुसंधान केंद्र (मिर्च रिसर्च सेंटर) 
तथा एक टेक्सटाइल पार्क और कपास निगम (CCI) केंद्र के साथ-साथ आधुनिक भंडारण (स्टोरेज सेंटर) स्थापित होता है तो किसानों के लिए बड़ी सौगात होंगी। यह परियोजनाएं 'आत्मनिर्भर भारत', 'मेक इन इंडिया' और 'वोकल फॉर लोकल' जैसे कार्यक्रमों के अनुरूप हैं और इनसे न केवल किसानों की आर्थिक स्थिति सुधरेगी बल्कि पूरे क्षेत्र में आर्थिक विकास को गति मिलेगी।
 *पर्यटन स्थलों का हो विकास* 
सांसद पाटील ने खंडवा जिले के ओंकारेश्वर में ज्योतिर्लिंग तीर्थस्थल और इंदिरा सागर बांध समूह में स्थित अन्य द्वीपों (जैसे हनुवंतिया, नागरेटा, सेगोनिया टापू) को विकसित करने के लिए विशेष पैकेज की मांग की। ओंकारेश्वर में बढ़ती तीर्थयात्रियों की संख्या को देखते हुए, उन्होंने सड़कों के निर्माण, घाटों के जीर्णोद्धार और नर्मदा नदी में नाव सेवाओं के उन्नयन की आवश्यकता पर जोर दिया। इसके अलावा, उन्होंने इन द्वीपों को 'द्वीप पर्यटन' के रूप में विकसित कर केरल की तर्ज पर एक प्रमुख पर्यटन स्थल बनाने का अनुरोध किया । जिससे इस क्षेत्र में पर्यटकों की संख्या में वृद्धि होगी और रोजगार के नए अवसर पैदा होंगे। सांसद ने प्रधानमंत्री से इन महत्वपूर्ण परियोजनाओं को मंजूरी देने और आवश्यक वित्तीय सहायता प्रदान करने का आग्रह किया।
 *मंदिर की प्रगति से कराया अवगत दिया निमंत्रण* 
इस दौरान सांसद श्री पाटील ने खंडवा में श्री दादाजी धुनिवाले जी के बन रहे भव्य मंदिर के प्रगति से प्रधानमंत्री जी को अवगत कराया एवं मंदिर के उदघाटन कार्यक्रम मे पधारने के लिए विशेष आमंत्रण भी दिया।

सांसद ज्ञानेश्वर पाटील ने केंद्रीय कृषि मंत्री से की मुलाकात

🔸खंडवा जलगॉव । प्रशांत बोरकर । तरुण तडफदार न्यूज प्रतिनिधी 🔸
सांसद ज्ञानेश्वर पाटील ने केंद्रीय कृषि मंत्री से की मुलाकात
 *बुरहानपुर जिले में केला अनुसंधान केन्द्र हो स्थापित ग्रामीण क्षेत्रों में नवीन सड़कों की मिले स्वीकृति* 

- विकास का वादा ज्ञानेश्वर दादा
- 28 नवीन सड़को की स्वीकृति हेतु सौंपा पत्र

बुरहानपुर। आज खंडवा लोकसभा सांसद ज्ञानेश्वर पाटील ने नई दिल्ली में केंद्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान से भेंट कर बुरहानपुर जिले में केला अनुसंधान केन्द्र स्थापित करने तथा ग्रामीण क्षेत्रो में नवीन सड़क मार्गो के निर्माण स्वीकृति हेतु पत्र सौंप अनुरोध किया। केंद्रीय मंत्री ने आश्वस्त किया कि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व वाली भाजपा सरकार जन व किसान हितैषी सरकार है इन मांगो पर सरकार द्वारा सार्थक निर्णय लिया जाएगा।
 *एक जिला एक उत्पाद में शामिल है केला फसल* 
सांसद श्री पाटील ने बताया कि मेरे संसदीय क्षेत्र खंडवा के अंतर्गत बुरहानपुर जिला केला उत्पादक हैं। बुरहानपुर जिले में एक जिला एक उत्पाद के अंतर्गत केला फसल का चयन किया गया हैं। यहां पर लगभग 26000 हजार हेक्टेयर क्षेत्र में केले की खेती की जा रही हैं वर्तमान में बुरहानपुर एवं आस-पास कोई केला अनुसंधान केन्द्र नहीं हैं विगत कई वर्षों से केले की फसल में आ रही विभिन्न समस्याओं को ध्यान में रखते हुये केले के उत्पादन में नवीन तकनीकी, रोगों के समय पर निदान, केले का अन्य खाद्य उत्पादों में उपयोग बढाने एवं प्रसंस्करण हेतु अनुसंधान केन्द्र की अत्यंत आवश्यकता है।
 *किसानों के लिये होंगी बड़ी सौगात* 
 सांसद पाटील ने आग्रह किया कि अनुसंधान केन्द्र की स्थापना से चार प्रमुख क्षेत्रों में उद्यानिकी फसलों में सुधार, फसल उत्पादन, फसल कटाई के बाद प्रबंधन तथा उत्पादित फसलो के संरक्षण पर काम कर किसानों को इसका लाभ मिलेगा। इस अनुसंधान में टिशु कल्चर, जैव प्रौद्योगिकी, मृदा विज्ञान, पोषक तत्व प्रबंधन, शरीर विज्ञान, जैव रसायन, क्रीडा विज्ञान, सुत्रकृमि, कवक, शुष्म जीवाणु, वायरल विकृति विज्ञान और कटाई के बाद प्रौद्योगिकी अनुसंधान के लिये अच्छी तरह सुसज्जित प्रयोगशाला भी स्थापित होती है। जिससे किसानों को लाभ मिलेगा। बुरहानपुर जिले में केला अनुसंधान केन्द्र स्थापित होता है तो यह मेरे संसदीय क्षेत्र के किसान भाइयों के लिए बड़ी सौगात होंगी।
 *ग्रामीण क्षेत्रो मैं नवीन सड़कों के निर्माण की मिले स्वीकृति* 
सांसद पाटील ने केंद्रीय कृषि मंत्री को बताया की बुरहानपुर तथा नेपानगर विधानसभा के ग्रामीण क्षेत्रों में नवीन सड़क मार्गों की स्वीकृति मिल जाती है तो ग्रामीण एवं किसानों को आवागमन व खेती उपज लाने ले जाने में सुविधा होंगी। केंद्रीय मंत्री ने विश्वास दिलाया कि जल्द इन मार्गों के स्वीकृति प्रदान की जाएगी। सांसद ने ग्राम आमगांव से शंकरपुरा फाल्या,बाडा जैनाबाद से बाडा टांडा,बाकडी से बोमल्या पाट,बाकडी से नाडियामाल,बाकडी से नवाड ढाना,बाकडी से कोयलपानी,बाकडी से रिचुधाना,बाकडी से अंबापानी,चाकबारा से नवलसिंग फाल्या,चाकबारा से चाकबारा टाडा,चिडियामाल से इसराम फाल्या,हैदरपुर से गोथान मोहल्ला,हैदरपुर से छोटा तालाब मोहल्ला,हथनी चिडियापानी मार्ग,जामन्या से जवानसिंग फाल्या,ग्राम एकलारा से सुधीर ओंकार के खेत तक,ग्राम दर्यापुर कलां बालीका छात्रावास से फोपनार फाटे तक,ग्राम जसोंदी मेन रोड से युवराज भगवान के खेत तक,जलगांव जामोद रोड से तारापाटी तक,ग्राम मोरदड मेन रोड से पंचायती ट्युबवेल तक,ग्राम सिरसोदा में उत्तम बंशी के खेत से गोकुल बालु के खेत तक,ग्राम असीर में धुलकोट रोड से बरू नाला,ग्राम धुलकोट मेन से देशमुखी फाल्या तक,ग्राम उमरदा पुरुषोत्तम मनोहर चौधरी के खेत से डिगम्बर महाजन के खेत तक,ग्राम सांईखेडाकला से ग्राम सायर तक,ग्राम नसीराबाद फाटे से विष्णु सेठ के खेत तक,ग्राम निम्ना लालटेकरी से मुनसिंग नहारसिंह के खेत तक,ग्राम मोरदड खुर्द में प्रभु श्रावण के खेत से दारूखोरया के खेत तक नवीन मार्गों की स्वीकृति हेतु पत्र सौंपा।

Friday, August 8, 2025

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याणी नागूलकर व सचिव पदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड

🔸जळगांव । तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । प्रशांत बोरकर, शशांक बोरकर🔸
युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याणी नागूलकर व सचिव पदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड
*भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन* व *युवाशक्ती फाऊंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने *शनिवार, दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) जळगाव* येथे *युवतींची दहीहंडी* आयोजित करण्यात आली आहे. 

युवतींच्या दहीहंडीचे यंदा 17 वे वर्ष असून दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात *पुरूषांप्रमाणे युवतींचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे* या उद्देशाने ही दहींहंडी सुरू करण्यात आली आहे. *मानवी मनोरे बनविणे या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा* देण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी साजरी होत असते.

सदर दहीहंडी उत्सवाची समिती सर्वानुमते गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याणी नागूलकर व सचिव पदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड करण्यात आली आहे. 

*समस्त कार्यकारीणी पुढीलप्रमाणे-*

*अध्यक्ष-* 
डॉ. कल्याणी नागूलकर

*उपाध्यक्ष-* 
- डॉ. अनिता पाटील
- लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे
- डॉ.कल्याणी मोहरील 

*सचिव-* 
- प्रा. क्षमा सराफ

*स्वागत समिती प्रमुख-* 
- डॉ. सोनाली महाजन
- लिना पवार

*खजिनदार-*
- निलम जोशी

*सहसचिव-* 
- हर्षाली चौधरी
- संध्या कांकरीया

*प्रसिद्धी प्रमुख-* 
- यामिनी कुळकर्णी

*सदस्या-* 
- चेतना नन्नवरे
- प्रा. श्रीया कोगटा
- क्रिस्टाबेल परेरा

Saturday, August 2, 2025

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी**************************

🔸तरुण तडफदार न्यूज प्रतिनिधी । शशांक बोरकर🔸
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
**************************
रावेर दिनांक 1/8/2025 रोजी श्री शिवप्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर रावेर शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
       याप्रसंगी प्रतिमापूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर आणि शाळेतील शिक्षक वृंद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यानंतर भाषणांच्या कार्यक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी हिंदी भाषेतून या दोन्ही नेत्यांविषयी बालपण, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा विविध विषयांवर भाषणे दिली. या प्रसंगी मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना या दोन्ही नेत्यांविषयी सखोल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत पाठक यांनी केले.सदरील कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक श्री विनोद पाटील सौ ललिता राणे हे उमेश चौधरी, श्री राजेंद्र सपकाळ, श्रीम.उषा चव्हाण,श्री नितीन पाठक श्री सागर पवार, श्री अनिता सपकाळे आदी शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी जितेंद्र कानुगो उपस्थित होते.

Thursday, July 31, 2025

🙏 भारतीय रेल्वे चे जनक समाजसुधारक नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ की स्मृति में विशेष रेल सेवा शुरू करने की माँग 🙏160वीं पुण्यतिथि – 31 जुलाई 2025

*🙏 भारतीय रेल्वे चे जनक समाजसुधारक नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ की स्मृति में विशेष रेल सेवा शुरू करने की माँग 🙏*  
*160वीं पुण्यतिथि – 31 जुलाई 2025*
तरुण तडफदार न्यूज । शशांक बोरकर🔸
आज *भारतीय रेलवे के शिल्पकार* माने जाने वाले *नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ* की 160वीं पुण्यतिथि के अवसर पर *भारतीय किसान संघटन, महाराष्ट्र* की ओर से भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की जाती है।

नाना शंकरशेठ का भारतीय रेलवे के इतिहास में अतुलनीय योगदान रहा है। भारत की पहली रेलगाड़ी के मार्गदर्शक व समर्थक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

उनकी स्मृति में *खंडवा – बुरहानपुर – रावेर – भुसावल मार्ग होकर मुंबई* तक एक नई ट्रेन *“नाना शंकरशेठ एक्सप्रेस”* शुरू की जानी चाहिए, ऐसी माँग *भारतीय किसान संघटन के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर* ने की है।

*इस रेल सेवा के संभावित लाभ:*
- उत्तर महाराष्ट्र और मध्यप्रदेश के यात्रियों को सीधे मुंबई से जोड़ा जाएगा।
- ग्रामीण व पिछड़े क्षेत्रों के लोगों को सुलभ, सस्ता और सुरक्षित यात्रा विकल्प मिलेगा।
- नाना शंकरशेठ जी के योगदान को देश की ओर से सच्ची श्रद्धांजलि होगी।

*रेल मंत्रालय, शासन व जनप्रतिनिधियों से आग्रह है कि इस ऐतिहासिक व जनहित याचना पर गंभीरतापूर्वक विचार किया जाए।*

✍️ *प्रशांत बोरकर*  
प्रदेशाध्यक्ष, भारतीय किसान संघटन – महाराष्ट्र  
ओबीसी जनकल्याण संघ

मो.: 8208361187

---

Tuesday, June 24, 2025

जागतिक योगदिन उत्साहात साजरा *************************


रावेर । तरुण तडफदार न्यूज । शशांक बोरकर🔸
आज दि.21/6/2025 रोजी श्री शिव प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्या मंदिर रावेर शाळेत 21 जून हा जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका सौ.ललिता राणे मॅडम यांनी योग केल्यामुळे होणारे शारीरीक तसेच मानसिक फायदे यांचे महत्व सांगीतले.
         सूत्रसंचालन श्री. नितीन पाठक सर यांनी केले. याप्रसंगी सूर्यनमस्काराच्या प्रात्यक्षिकांमध्ये इ.1ली ते 10 वी पर्यतचे सर्व विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक यांनी सहभाग नोंदवला. पूरक हालचाली अंतर्गत मानेच्या हालचाली,पायांच्या ,कंबरेच्या हालचाली,तसेच आसने ताडासन ,वृक्षासन , पादहस्तासन,अर्धचक्रासन , त्रिकोणसन, भुजंगास न,कपालभाती ,प्राणायाम,व ध्यानाद्वारे योगदिन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
        याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर ,शिक्षक श्री उमेश चौधरी,श्रीमती उषा चव्हाण,श्री राजेंद्र सपकाळ, श्री चंद्रकांत पाठक,अनिता सपकाळे ,श्री सागर पवार, अश्विनी गाढे, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री जितेंद्र कानूगो उपस्थित होते.
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐

Friday, June 20, 2025

ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकार दरम्यानच्या ऐतिहासिक कराराला मान्यता

 धरणगाव... तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी

महाराष्ट्र राज्याचे यशस्वी, दूरदृष्टीसंपन्न आणि विकासाभिमुख नेतृत्व करणारे 'विकासपुरुष' मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब आज जळगाव जिल्ह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी आले असता त्यांचे स्वागत केले.
आदरणीय देवेंद्रभाऊ आणि आदरणीय गिरीशभाऊ यांच्या माध्यमातून 'बनाना बेल्ट'च्या सर्वांगीण विकासाला दिशा देणाऱ्या 'ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकार दरम्यानच्या ऐतिहासिक कराराला मान्यता देण्यात आली .या प्रकल्पासाठी जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील,केंद्रीय युवक आणि क्रिडा राज्यमंत्री खासदार श्रीमती रक्षाताई खडसे,वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजय भाऊ सावकारे यांचे सहकार्य लाभले.

या दूरदर्शी निर्णयाबद्दल जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कृषी परंपरेचे प्रतीक असलेल्या 'केळी'चे सन्मानचिन्ह त्यांना भेट स्वरूप दिले.

यावेळी माझ्या समवेत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री.संजय भाऊ सावकारे,धुळे शहर आमदार मा.श्री.अनुपभैया अग्रवाल,मुक्ताईनगर आमदार मा.श्री.चंद्रकांतजी पाटील,अमळनेर आमदार मा.श्री.अनिल जी पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते मित्र उपस्थित होते.

Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Devendra Fadnavis Girish Mahajan 

#जळगावविकास #BananaBeltDevelopment #ताप्तीबेसिनप्रकल्प #MegaRechargeProject #MaharashtraMPPartnership #JalgaonWelcomesFadnavis #केळीचेनगरी