Saturday, August 2, 2025

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी**************************

🔸तरुण तडफदार न्यूज प्रतिनिधी । शशांक बोरकर🔸
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
**************************
रावेर दिनांक 1/8/2025 रोजी श्री शिवप्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर रावेर शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
       याप्रसंगी प्रतिमापूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर आणि शाळेतील शिक्षक वृंद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यानंतर भाषणांच्या कार्यक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी हिंदी भाषेतून या दोन्ही नेत्यांविषयी बालपण, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा विविध विषयांवर भाषणे दिली. या प्रसंगी मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना या दोन्ही नेत्यांविषयी सखोल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत पाठक यांनी केले.सदरील कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक श्री विनोद पाटील सौ ललिता राणे हे उमेश चौधरी, श्री राजेंद्र सपकाळ, श्रीम.उषा चव्हाण,श्री नितीन पाठक श्री सागर पवार, श्री अनिता सपकाळे आदी शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी जितेंद्र कानुगो उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Thanks
https://www.linkedin.com/in/tarun-tadafdar-news-002b4a1a5
https://taruntadafdarnews.wordpress.com/ https://mobile.twitter.com/TARUNTADAFDAR8 https://www.youtube.com/c/TARUNTADAFDARNEWS