🔸तरुण तडफदार न्यूज प्रतिनीधी । शशांक बोरकर🔸
🚩 सराफ सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य 🚩
सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पी.आय. संजय जगताप साहेब यांच्याशी समितीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वाढता भ्रष्टाचार आणि दलालांमार्फत व्यापाऱ्यांची होणारी लूट या गंभीर विषयांवर सखोल चर्चा झाली.
समितीचे कार्य हे प्रामाणिक, कायदेशीर आणि व्यापाऱ्यांच्या न्यायासाठी झटणारे असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी साहेबांनी समितीच्या कामाचे कौतुक करून पुढील काळातही कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले.
प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान करणे हीच समितीची ओळख आहे. अशा अधिकारीवर्गासोबत राहून व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याच प्रसंगी सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाला समितीचे निवेदन सादर करण्यात आले.
📌 उपस्थित मान्यवर:
प्रदेशाध्यक्ष – उमेश शेठ बुऱ्हाडे .
महाराष्ट्र राज्य - सहसंपर्कप्रमुख उमेश जी बागडे
पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख – सचिनजी बानकर
सोलापूर जिल्हाध्यक्ष – गणेशजी मैड
जिल्हा संपर्कप्रमुख – दत्तानंद मोहरे
जिल्हा उपाध्यक्ष – दिलीपजी सिद्धवाडकर
माळशिरस तालुका प्रमुख – बालाजी शेठ दीक्षित
मोहोळ तालुका प्रमुख – संजय स्वामी
पुणे जिल्हा महिला अध्यक्ष – सीमाताई काळंगे
तसेच अनेक सराफ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🚩 जय नरहरी | जय संविधान 🚩
🚩 कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल! 🚩
No comments:
Post a Comment
Thanks
https://www.linkedin.com/in/tarun-tadafdar-news-002b4a1a5
https://taruntadafdarnews.wordpress.com/ https://mobile.twitter.com/TARUNTADAFDAR8 https://www.youtube.com/c/TARUNTADAFDARNEWS